लाहोर- उद्यापासून म्हणजेच 30 सप्टेंबरपासूून पाकिस्तानात प्राथमिक शाळा सुरु केल्या जाणार आहे. पाकिस्तानमध्ये मोठ्या शाळा व महाविद्यालय सुरू झाल्याच्या 15 दिवसांनंतर या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून प्राथमिक शाळेतील मुलांच्या संरक्षणासाठी शाळा स्वच्छ करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी मैदानात सर्कल बनविली गेली आहेत. मुलांना फक्त या सर्कलवर चालत जावे लागते
त्याच वेळी सुमारे 12 मुलांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनानं जारी केलेल्या एसओपीमध्ये पाकिस्तान सरकारने असेही म्हटले होते की, शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनंतर नियमितपणे येणा-या सर्वांची कोरोना चाचणी घेतली जाईल.
कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांचा यात समावेश आहे. मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने कठोर कारवाईचा अवलंब केला आहे. शाळा-महाविद्यालय सुरू झाल्यानंतर 48 तासांच्या आत सरकारने कोरोनासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केलेल्या शाळांवर कारवाई सुरू केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणा-या 32 शाळा 32 तासांच्या आत सील करण्यात आल्या.