सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 66 नागरिकांना दहा दिवसांनंतर सोमवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. करोनाग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून सोमवारी 17 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.
कृष्णा हॉस्पिटलमधील करोनामुक्तांना कराड तालुका पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ व हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस आर. पाटील, डॉ. नम्रता कदम, योगेश कुलकर्णी उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कबुले आळीतील 16, 17 वर्षीय तरुण व 22, 45 वर्षीय महिला, भगवा चौकातील 50 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील कास येथील 53 वर्षीय पुरुष, सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पुनवडीतील 40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, 35, 31, 42, 72, 21 व 23 वर्षीय महिला, सायगाव येथील 51 वर्षीय पुरुष पोलीस कर्मचारी, रामवाडीतील 60 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील पसरणी येथील 65 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष.
सोनगीरवाडीतील 36 वर्षीय महिला व 14 वर्षांची मुलगी, सातारा तालुक्यातील जिहे येथील 60 वर्षीय महिला, शिरगाव येथील 40, 69 वर्षीय पुरुष, 5 वर्षांचा मुलगा, बोरगाव येथील 12 वर्षांचा मुलगा, 40 वर्षीय महिला, भरतगाववाडीतील 44, 45 वर्षीय महिला व 51, 15, 77 वर्षीय पुरुष, करंजे (सातारा) येथील 45, 25, 23 व 56 वर्षीय महिला, खावलीतील 60 वर्षीय महिला.
सातारा शहरातील राधिका रोडवरील विमल रॉयल सिटीतील 35 व 58 वर्षीय महिला व 8 वर्षांची बालिका, धनगरवाडीतील 28 वर्षीय युवक व 43 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील शेनवडी (कुंभारगाव) येथील 45 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 40 व 23 वर्षीय महिला, गमेवाडीतील 50 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय तरुणी, तारुख येथील 57 वर्षीय पुरुष, कोरिवळे येथील 30 वर्षीय महिला, बनवडीतील 13 व 11 वर्षांच्या मुली, 7 व 14 वर्षांची मुले, धावरवाडीतील 8 वर्षाचा मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षीय महिला.
येळगावमधील 58 वर्षीय पुरुष, शिरवळ पोलीस ठाण्यातील 30 वर्षीय युवक, खटाव तालुक्यातील निमसोड येथील 16 व 14 वर्षीय मुले, फलटण तालुक्यातील मलठण येथील 58 वर्षीय पुरुष, सरडे येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आसू येथील 22 वर्षीय युवक, जाधववाडीतील 6 व 13 वर्षांच्या मुली, साखरवाडीतील 45 वर्षीय पुरुष, तळबीडमधील 45 वर्षीय महिला, यांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 21, कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील 64, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 28, कोरेगाव येथील 32, वाई येथील 31, शिरवळ येथील 44, रायगाव येथील 44, पानमळेवाडीतील 24, मायणीतील 26, महाबळेश्वरमधील 7, पाटणमधील 23, दहिवडीतील 27, खावलीतील 40 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 94, अशा एकूण 505 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने पुणे व कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.