कोमोटिनी (ग्रीस) : रेफ्रिजेटेड ट्रकमधून 41 स्थलांतरीतांची जीवंत सुटका करण्यात आली. सोमवारी ही अमनावी घटना उघडकीस आली. पोलिसांनी या ट्रक चालकाला अटक केली आहे.
हे स्थालांतरीत अफगाण वंशीय आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यापैकी सात जणांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. या ट्रकमध्ये पुरूष आणि मुले होती. त्यांचे नेमके राष्ट्रीयत्व समजण्यास आणखी दोन दिवस लागतील असे पोलिसांनी सांगितले.
इग्नेशीया महामार्गावर पोलिसांनी संशयावरून या ट्रकची कसून तपासणी केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला, सांथी आणि कोमोटिनी या दोन शहरांमध्ये हा ट्रक अडवण्यात आला. ट्रकच्या चलकाला अटक करण्यात आली असून तो जॉर्जीयाचा रहिवासी आहे.
गेल्या महिन्यात अशाच रेफ्रिजरेटेड ट्रकमध्ये गारठून 39 विहएतनामी नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जगभर मानवी तस्करीची चर्चा सुरू झाली होती. त्यातच गेल्या शनिवारी फ्रान्स आणि इटलीच्या सीमवे 31 पाकिस्तानी स्थलांतरीतांना अटक करण्यात आली होती.