नागपुरात ३ वाजेपर्यंत ३८.३५% मतदान

नागपूर : 17 वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी आज लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि 2 केंदशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश असून या पहिल्या टप्प्यात भाजपाचे नितीन गडकरी व हंसराज अहिर या दोन केंद्रिय मंत्र्यांबरोबरच कॉंग्रेसचे नाना पटोले, मावळते खासदार रामदास तडस, भावना गवळी, कृपाल तुमाने व अशोक नेते आदी दिग्गज्जांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून चोख बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे.

सतराव्या लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम अशा सात मतदारसंघात मतदान होत आहे. या 7 मतदारसंघात एकूण 116 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. आज दुपारपर्यंत या सात मतदारसंघातील सरासरी मतदान ३८.३५% एवढे झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.