orry awatramani – बिझनेस टायकून ते सोशलाईट नीता अंबानी आणि बॉलीवूड सेलिब्रिटींपासून ते त्यांच्या मुलांपर्यंत, “ओरी अवतरामणी’ (orry awatramani) एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. ओरी अवत्रामणी गेल्या काही वर्षांमध्ये स्टार किड्ससोबत सतत दिसत आहे.
सोशल मीडिया हँडलवर व्हायरल होत असलेल्या ओरीच्या फोटोंखाली, ओरी कोण आहे? आणि तो आयुष्यात काय करतो? असे अनेक प्रश्न कमेंटमध्ये विचारले जातात. चला तर मग बघूया कोण आहे ओरी? आणि त्याचा बॉलिवूड सेलिब्रिटींशी काय संबंध आहे?
24 वर्षीय ‘ओरी’चे खरं नाव “ओरहान अवत्रामणी’ (orry awatramani) असून, ‘मुंबईकर’ ओरीने न्यूयॉर्कमधून शिक्षण घेतले आहे. फाइन आर्ट्स आणि कम्युनिकेशन डिझायनिंगमध्ये त्यानी पदवी प्राप्त केली आहे.
मुंबईतील व्यापारी कुटुंबातील ओरी त्याचे वडील जॉर्ज अवत्रामणी, आई शहनाज आणि दोन भावांसह राहतात. त्याचा भाऊ जनसंपर्क कंपनी सांभाळतो करतो तर, दुसरीकडे ओरी स्वतः ट्रेन अॅनिमेटर आहे.
ओरीचे अंबानी कनेक्शन जाणून घ्या…
ओरी स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजतो. सध्या ओरी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मध्ये स्पेशल प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून एका प्रोजेक्टवर काम करत आहेत. रिलायन्स रिटेल अंतर्गत, ओरी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भारतीय फॅशन उद्योग (नुकतेच मेगा शॉपिंग सेंटर ‘जिओ प्लाझा’ लाँच केले) या योजनेवर काम करत होता.
अशा परिस्थितीत त्याचे ईशा अंबानीशी नाते जोडणे स्वाभाविक आहे. ओरी अनेक वेळा ईशा अंबानी आणि राधिका मर्चंटसोबत स्पॉट देखील झाला आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, स्वत:बद्दल बोलताना ओरीने म्हटले होते की, “तो चित्रपटसृष्टीतील लोकांना ओळखत नाही. ज्या लोकांसोबत तो फोटो शेअर करतो ते कदाचित जगातील सेलिब्रिटी असतील पण ओरी साठी ते त्याचे कॉलेज किंवा शाळेतील मित्र आहेत. ज्यांच्यासोबत त्याला वेळ घालवायला आवडते. पण मीडिया त्याच्या मित्रांमध्ये फक्त स्टार मुलांनाच स्पॉट करते’.