नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी दिल्लीच्या मुखर्जी नगर भागात पोहोचले आणि त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि कर्मचारी निवड आयोग (SSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांची भेट घेतली.
मानहानीच्या खटल्यातील त्यांच्या शिक्षेला आव्हान देणारी त्यांची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली त्या दिवशी राहुल गांधींनी या तरुणांची भेट घेतली. राहुल गांधी मुखर्जी नगरमध्ये रस्त्याच्या कडेला या तरुणांसोबत बसून बोलतांना दिसले. बैठकीत या तरुणांनी परीक्षेच्या तयारीशी संबंधित त्यांचे अनुभव सांगितले.
तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी संध्याकाळी अचानक येथे जुन्या दिल्लीतील बंगाली मार्केट आणि जामा मशीद परिसरात पोहोचले, जिथे त्यांनी गोलगप्पा, टरबूज आणि इतर काही पदार्थांचा आस्वाद घेतला.