मुंबई – आयपीएल स्पर्धेत यंदाच्या मोसमात सलग सहा पराभव स्वीकारलेल्या मुंबई इंडियन्सला आता या परिस्थितीतही प्लेऑफला पात्र व्हायचे असेल तर त्यांना पुढील आठही सामने जिंकावे लागतील.
तसेच त्यात सरस नेटरनरेटही ठेवावा लागेल. पहिले काही सामने गमावूनही विजेतेपद पटकावण्याची किमया मुंबईने 2015 साली केली होती. त्यावेळीही स्पर्धेत 10 संघ होते. यंदाही स्पर्धेत दोन नव्या संघांमुळे 10 संघ सहभागी झालेले आहेत.
अशा स्थितीत 16 गुण झालेले संघ प्लेऑफला पात्र ठरतील. त्यामुळे मुंबईसाठी ही एकच अखेरची संधी आहे. यंदाच्या मोसमात कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.