नवी दिल्ली – केंद्रीय विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 1 एप्रिल 2021 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होईल, तर इयत्ता दुसरी आणि त्यापुढील इयत्तांसाठी नोंदणी 8 एप्रिल 2021 पासून ऑफलाईन पद्धतीने करता येईल.
इयत्ता पहिलीसाठी ऑनलाइन नोंदणी 1 एप्रिल 2021रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 19 एप्रिल 2021 रोजी संध्याकाळी 7 वाजता बंद होईल. प्रवेशासंबंधी माहिती https://kvsonlineadmission.kvs.gov.in/apps संकेतस्थळावरून तसेच मोबाइल ऍपद्वारे मिळू शकेल.
2021-2022 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या केंद्रीय विद्यालयामध्ये ऑनलाइन प्रवेशासाठी अधिकृत ऍन्ड्रॉईड मोबाइल ऍप आणि ऍप डाउनलोड आणि इनस्टॉल करण्यासाठी सूचना https://kvsonlineadmission.kvs.gov.in/apps वर आणि ेगुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असतील. इयत्ता दुसरी आणि त्यापुढे प्रवेश घेण्यासाठी सकाळी 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 8:00 ते 15 एप्रिल 2021 रोजी दुपारी 4:00 पर्यंत या वेळेत ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध जागांच्या आधारे नोंदणी करता येईल.
इयत्ता अकरावीसाठी केव्हीएस (मुख्यालय) संकेतस्थळ (https://kvsangathan.nic.in) वर उपलब्ध असलेल्या 2021-2022 प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार नोंदणी अर्ज विद्यालय संकेतस्थळावरून डाउनलोड केले जाऊ शकतात.
सर्व इयत्तांसाठी वयाची गणना 31 मार्च 2021 रोजीची धरली जाईल. जागांचे आरक्षण संकेतस्थळांवर ((https://kvsangathan.nic.in) वर उपलब्ध असलेल्या केव्हीएस प्रवेश मार्गदर्शक सूचनानुसार असेल. सध्या केंद्रीय विद्यालय संघटना 1247 केंद्रीय विदयालयांची साखळी चालवत आहे.