आदिवासींच्या योजनांचे ऑनलाईन मॉनिटरींग

नवी दिल्ली – आदिवासींच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी नीट सुरू आहे की नाही याची ऑनलाईन देखरेख ठेवली जात आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज दिली. त्यांनी सांगितले की आदिवासींसाठी निती आयोगाच्या शिफारशींनुसार योजना आखण्यात आल्या असून त्यांच्या सर्व योजना आणि उपयोजनांचे ऑनलाईन मॉनिटरींग केले जात आहे.

लोकसभेत बोलताना ते म्हणाले की अदिवासींच्या विविध योजनांसाठी राखून ठेवण्यात आलेला निधी आणि त्याविषयीची तरतूद तसेच त्याच्या खर्चावर ऑनलाईन माध्यमातून योग्य ती देखरेख ठेवली जात आहे. त्यासाठी विविध पोर्टल्स तयार करण्यात आली आहेत. आदिवासींविषयी संशोधनाच्या कार्यालाही केंद्र सरकारतर्फे अनुदान दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.