नवी दिल्ली – भारताची धावपटू हिमा दास हिने पोलंडमध्ये आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली. तिने कुन्टो मैदानी स्पर्धेतील 200 मीटर्स शर्यतीत अव्वल स्थान घेतले. तिने हे अंतर 23.97 सेकंदात पार केले. तिची सहकारी व्ही.के.विस्मया हिने हे अंतर 24.06 सेकंदात पार करीत रौप्यपदक पटकाविले.
गेल्या आठवड्यातही हिमा हिने पोलंडमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनासने 200 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. त्याने ही शर्यत 21.18 सेकंदात पूर्ण केली.