आर्टिकल 15 सिनेमाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली – आर्टिकल 15 या चित्रपटाला देण्यात आलेले सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीचे प्रमाण पत्र रद्द करावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्यांनी येथे याचिका दाखल करण्याच्या आधी संबंधीत अधिकाऱ्यांकडे जाऊन आपले म्हणणे सादर करावे असे न्यायालयाने त्यांना सुनावले आहे.

आयुष्यमान खुराना यांची भूमिका असलेला हा चित्रपट 28 जून प्रासून सर्वत्र प्रसारीत झाला आहे. ब्राम्हण समाजाच्यावतीने ही आव्हान याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात ब्राम्हण जातीचा अवमान करणारा काही उल्लेख आहे त्यामुळे भावना दुखावल्याचा आक्षेप त्यात घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सुचनेनंतर ही याचिका मागे घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.