पुणे- युवा थिएटर प्रॉडक्शन निर्मित ‘चॉकोलेट डे’ या नाटकाचा ‘ऑनलाइन स्वरूपातील प्रयोग ७ नोव्हेंबर रोजी ९:३० वाजता होणार आहे, प्रेक्षकांना ४८ तासात कधीही हा प्रयोग ऑनलाईन स्वरूपात पाहता येईल.
नाटकाचे पारंपरिक स्वरूप न बदलता त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन रंगमंचावरील सादरीकरणाचा सुहृद प्रेक्षकांना घर बसल्या आस्वाद घेता यावा यासाठी या नाटकाची रचना दिग्दर्शक गंधर्व गुळवेलकर व निर्माते मनोज नरुले यांनी आखली आहे.
बऱ्याचदा अनपेक्षितपणे आलेल्या पेच प्रसंगाचा सामना करताना आपली खूप धावपळ होते. त्यातून गोंधळ निर्माण होतो. हाच गमतीशीर गोंधळ हलक्याफुलक्या विनोदीरूपात लेखक दिग्विजय पवार याने खुसखुशीत शैलीत मांडला आहे.
चॉकलेट डे या नाटकात वरद पुरंदरे, वैष्णवी थोरात, व प्रथमेश अत्रे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाटकातील सर्व सहभागी कलाकार हे तरुण आहेत.
कुठे आणि कसा पाहणार प्रयोग-
तिकीट, Ticket Khidakee ह्या वेबसाईट वर उपलब्ध आहेत ( https://www.ticketkhidakee.com/ ) अधिक माहितीसाठी संपर्क: ७४४७४०५८४४, ८३८००८७७६३