नगर -ऐतिहासिक नगर शहराचा स्थापना दिन येत्या 28 मे ला साजरा होत असून नगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने शहराच्या 530 व्या वर्धापनदिना निमित्त विविध ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांनी सांगितले.
यामध्ये चित्रकला स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, सायन्स प्रोजेक्ट बनवा स्पर्धा व घोषवाक्य बनवा अशा विविध स्पर्धांचे आयोजन 22 ते 24 मे 2020 या दरम्यान होणार आहेत. नगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन स्पर्धांत भाग घेण्यासाठी इच्छुकांनी https://nagarjallosh.epzy/ या लिंक वर जाऊन आपले नाव 20 मे 2020 पर्यंत नोंदवण्याचे आवाहन नगर जल्लोषचे संयोजन समिती प्रमुख माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केले.
स्पर्धेत 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. चित्रकला स्पर्धा 1 ली ते 4 थी गट, 5 वी ते 7 वी गट व 8 ते 10 वी या तीन गटांमध्ये होणार असून, स्पर्धेसाठी करोना बाबत जनजागृतीचे विषय देण्यात आले आहे. या सर्व स्पर्धांचा निकाल 28 मे 2020 रोजी जाहीर होईल. अधिक माहिती साठी (मो.7448192918) संपर्क साधावा.