नवी दिल्ली – भारती एअरटेल उद्योग समूहाची उपकंपनी असलेली वनवेब कंपनी आपले स्वतःचे सॅटॅलाइट इस्रोच्या तळावरून लवकरच सोडणार आहे. ही माहिती भारती इंटरप्राईजेसचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी दिली.
2022 च्या मध्यापासून सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्याचा कंपनीचा विचार आहे. इतर देशातील दूरसंचार कंपन्या वेगाने आकाशात सॅटेलाईट पाठवत आहेत. त्यामुळे भारतानेही या क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.