मुंबई – आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पार पडल्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.
त्यांच्याजागी कोणाची नियुक्ती होणार याची चर्चा सध्या जोरदार सुरु असून त्यात आता ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू टॉम मुडी यांचेही नाव शर्यतीत सामील झाले आहे.
राहुल द्रविड, अनिल कुंबळे, व्हिव्हिएस लक्ष्मण यांच्या जोडीला आता मुडी यांच्याही नावाची चर्चा होत असून त्याबाबत अद्याप खुद्द मुडी किंवा बीसीसीआयने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. मुडी हे सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते.
आता ही स्पर्धा संपल्यावर त्यांचा हैदराबादशी असलेला करारही संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच त्यांना भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.