लंडन – सूर्यप्रकाश हा ड जीवनसत्त्वाचा सर्वात मोठा स्त्रोत मानला जातो नियमित आहाराचा विचार केल्यास दूध अंडी आणि माशांमध्ये ड जीवनसत्व मुबलक प्रमाणात सापडते आता वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत असा एक टोमॅटो तयार केला आहे ज्यामध्ये ड जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात सापडणार आहे या टोमॅटोचे वर्णन सुपर टोमॅटो असे केले जात आहे.
दोन अंड्यांमध्ये जेवढे जीवनसत्व असते तेवढे जीवनसत्त्व एका टोमॅटोमध्ये आढळणार आहे जिन एडिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून हा सुपर टोमॅटो तयार करण्यात आला आहे जे लोक शाकाहाराला पसंत करतात त्यांना मांसाहारातून मिळणारे जीवनसत्व उपलब्ध होत नाही त्यांच्यासाठी हा सुपर टोमॅटो वरदान ठरणार आहे इंग्लंडमधील जॉन रिसर्चसेंटर मधील वैज्ञानिकांनी हा वैज्ञानिक चमत्कार करून दाखवला आहे.
जगभरातील शंभर कोटी पेक्षा जास्त लोकांना सध्या ड जीवनसत्वची कमतरता जाणवत आहे भारताचा विचार करता 76 टक्के लोकांमध्ये ड जीवनसत्वाचा अभाव आढळतो या सेंटरमधील वैज्ञानिकांनी जो सुपर टोमॅटो तयार केला आहे त्या मधून मिळणारे विटामिन डी हे दोन अंड्यांमधून मिळणाऱ्या विटामिन डी प्रमाणेच मत्स्याहार केल्यामुळे मिळणार्या जीवनसत्व एवढाच आहे नेचर प्लांट्स नावाचा जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आगामी कालावधीमध्ये आणखी काही भाज्यांवर संशोधन करून त्यांच्यामध्ये सुद्धा जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवण्याचे प्रयोग केले जाणार आहेत त्यासाठी सिमला मिरची वांगी मशरूम बटाटे या भाज्यांवरही नजिकच्या काळामध्ये प्रयोग केले जाणार आहेत.