कोरेगाव -पुसेगाव-कोरेगाव रस्त्यावर रामोशीवाडी (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत काल (दि. 19) सायंकाळी रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरच्या मडगार्डला बुलेट मोटारसायकल धडकून उमेश पोपट माने (वय 43, रा. प्रोफेसर कॉलनी, शिवाजीनगर, कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत अरुण आबासाहेब वाघ (रा. मोळ, ता. खटाव) यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, पुसेगाव-कोरेगाव रस्त्यावर रामोशीवाडी हद्दीत एका दुकानासमोर पार्किंग लाइट व रिपलेक्टर न लावता धोकादायक स्थितीत डम्पर (एमएच-11-बीके-1311) काल (दि. 19)
सायंकाळी 7.30 वाजता उभा केला होता. त्यावेळी पुसेगावकडून कोरेगावकडे निघालेली बुलेट मोटारसायकल (एमएच-11-सीटी-7003) डम्परच्या पाठीमागील उजव्या बाजूच्या टायरच्या मडगार्डला धडकली. या अपघात उमेश माने हे जागीच ठार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत तपास करत आहेत.