वाघळवाडी -येथील एका ऑफिसमधील टीव्ही आणि डिश चोरी प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी एक जणाला ताब्यात घेतले आहे. वाघळवाडीचे उपसरपंच जितेंद्र सकुंडे यांच्या खासगी ऑफिसमधील टीव्ही आणि डिश (दि. 8) रोजी चोरीस गेल्यानंतर त्यांनी करंजेपुल पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोरी झालेला टीव्ही शेंडकरवाडी या ठिकाणी विकला असल्याचे पोलिसांना समजल त्यानुसार एका अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चौकशीसाठी एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र फणसे व पोलीस नाईक नितीन बोराडे करत आहेत.