मुंबई – भाजपा नेते नितेश राणे शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर नेहमीच जहरी टीका करतांना दिसतात. यावेळी सुद्धा शिवसेना विरुद्ध नितेश राणे वाद चांगलाच चर्चेत आला आहे. विधानभवनात नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचल्याचा व्हिडियो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस म्हणजेच बुधवार विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील ‘संघर्षामुळे’ गाजला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्ष भाजप आक्रमक दिसला. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधी पक्ष भाजपचे सदस्य आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
मांजर आडव गेले तरी थांबू नये ही प्रबोधनकारांची थोर शिकवण महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री मा.आदित्यजी ठाकरे यांनी तंतोतंत पाळली !! #म्याव_म्याव
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) December 23, 2021
भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनात येताच, आमदार नितेश राणे यांनी म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या.
दरम्यान, शिवसेनेकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलं नव्हतं. मात्र, मनिष कायंदे यांनी ट्विट करुन राणेंवर पलटवार केला आहे.