मुंबई – कॉफी विथ करण 7 सुरू झाला आहे, या शोच्या नवीन एपिसोडमध्ये बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार आणि साऊथची सुपरस्टार समंथा रुथ प्रभू दिसले. शोच्या या एपिसोडमध्ये, होस्ट करण अक्षय सोशल मीडिया ट्रोलिंग आणि नवोदितांसोबत काम करण्याबद्दल बोलतो आहे.
अशातच या शोमध्ये अक्षय कुमार सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत उडतपणे बोलला आहे. करणने अक्षयला विचारले,’तू ट्रोल होतोय का? अक्षय म्हणाला, ‘होय मला कॅनडावरून अधिकाधिक ट्रोलिंग केले जाते.मात्र मला या ट्रोलिंगची पर्वा नाही. करण पुढे म्हणाला, ट्रोल्स तुम्हाला कॅनडा कुमार देखील म्हणतात. यावर अक्षयने उत्तर दिले की, ‘हो ठीक आहे मला कॅनडा कुमार म्हणा, मला काही फरक पडत नाही.’ असं म्हणत अक्षय कुमारने आपलं मत मांडलं
दरम्यान, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान न केल्यामुळे अक्षय कुमारला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा एक जुना व्हिडिओही व्हायरल होत होता, ज्यामध्ये त्यांनी कॅनडाचे नागरिकत्व असल्याचे सांगितले होते. यानंतर त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
करणने अक्षयला विचारले की, तुझ्या वयापेक्षा लहान अभिनेत्रींसोबत काम केल्यामुळे तुला ट्रोल केले जाते. यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला, ‘सर्वांना माझा हेवा वाटतो. का… करू नये? मी त्यांच्यासोबत काम करू शकतो. मी ५५ वर्षांचा आहे का?’
अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. यात अक्षयसोबत भूमी पेडणेकर दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘OMG-2’, ‘सेल्फी’, ‘गोरखा’ आणि राम सेतू सुद्धा येत्या काळात येणार आहेत.