ओला इलेक्‍ट्रिक 1 लाख चार्जिंग पॉइंट्‌स उभारणार

बंगळुरू -ओला इलेक्‍ट्रिक या कंपनीने इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच ही कंपनी 400 शहरांमध्ये एक लाख चार्जिंग पॉइंट्‌स उभारणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ओला स्कूटर इलेक्‍ट्रिक स्कूटर बाजारात उपलब्ध करणार आहे. भारतात इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढू शकतो. मात्र त्यासाठी चार्जिंग पॉइंट्‌सची आवश्‍यकता आहे. आम्ही याकामी पुढाकार घेणार आहोत. त्यामुळे जर भारतात इलेक्‍ट्रिक वाहने वाढण्यास मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.