सोन्याची आयात वाढली

आयात शुल्क कमी; सोन्याचे दर कमी

नवी दिल्ली  -अमेरिका, ब्रिटन यांसारख्या निर्यात बाजारपेठांमधून भारताच्या रत्ने व दागिने उत्पादनांच्या मागणीमध्ये झालेली वाढ, देशातील लग्नसराईची सुरुवात, तसेच सोन्याच्या किमतीमध्ये झालेली घसरण, यामुळे सोन्याच्या आयातीत वाढ झाली असल्याचे जेम अँड ज्वेलरी एक्‍स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलकडून (जीजेईपीसी) सांगण्यात आले.

जीजेईपीसीने अनेक वेगवेगळ्या आभासी रत्ने व दागिने कल मेळाव्याचे आणि विक्रेते-खरेदीदारांच्या संमेलनांचे (व्हीबीएसएम) आयोजन केले होते. यामुळे भारतीय उत्पादकांकडून विविध रत्ने व दागिने उत्पादनांसाठी नोंदवले जाणाऱ्या मागणीला प्रोत्साहन मिळाले.

जीजेईपीसीचे अध्यक्ष कोलीन शाह यांनी सांगितले की, मौल्यवान धातूच्या मागणीबाबत सुस्पष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी बाजारपेठेतील एकंदरीत कलाचे समावेशक पद्धतीने अवलोकन केले पाहिजे. मागील वर्षाची आयात कमी असणे, सोन्याच्या किमतींमध्ये झालेली घसरण, आयात शुल्क कमी होणे यांसारखे घटक या काळात देशात सोन्याची आयात वाढण्याला कारणीभूत ठरले. 2018-19 मध्ये सोन्याची आयात 80 टन होती; जी मागच्या वर्षी 50 टनांपर्यंत कमी झाली.

मार्च 2020 मध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे अवघे 28 टन सोने आयात करण्यात आले. यामुळे तुलनात्मकदृष्ट्या यंदाच्या वर्षाची सोन्याची आयात सरस ठरली आहे. सोन्यावरील शुल्कामध्ये 7.5 टक्‍क्‍यांपर्यंतची घट करण्यात आल्यामुळे आयातीला प्रोत्साहन मिळाले. सोन्याच्या सध्याच्या किमती भविष्यात तशा राहणार नाहीत, अशी भावना असल्याने किमतींमध्ये घट झाल्याचा संधीचा फायदा गुंतवणूकदारांनी घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.