न्यूयॉर्क : येत्या काही दिवसांमध्ये ट्विटरच्या वापरकर्त्यांना एलन मस्क मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. मायक्रो ब्लोगिंग प्रकारातील या साइटवर लवकरच वापरकर्ते मोठे आणि लांबलचक ट्विट करू शकतील.
ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी सोमवारी या बातमीला दुजोरा दिलेला आहे. ते म्हणाले, की आता ट्विटरचे वापर करते दहा हजार शब्दांपर्यंतचा मजकूर पोस्ट करू शकतील. ही सुविधा निर्माण करण्यासाठी सध्या काम सुरू असून लवकरच वापरकर्त्यांना ही सुविधा उपलब्ध होईल.
यातील मेख म्हणजे दरमहा 850 भरून सबस्क्रीप्शन घेणाऱ्या वापरकर्त्यांनाच ही सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळणार आहे. म्हणजेच सबस्क्रिप्शन घेणारे वापरकर्तेच मोठी पोस्ट ट्विट करू शकतात.
त्या उलट सबस्क्रिप्शन न घेणारे वापर करते केवळ 280 अक्षरांची पोस्ट ट्विट करू शकणार आहेत. एका परीने ट्विटरचे उत्पन्न वाढवण्यासाठी मस्क यांनी ब्लू टिकचा अतिशय हुशारीने वापर केल्याचे दिसून येत आहे.