मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबुकवर अश्लील टिप्पणी पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.हे फेसबुक अकाऊंट ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याच्या नावावर आहे असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी एका महिलेने तक्रार दिली असून ही तक्रारदार महिला शिंदे गटाची कार्यकर्ती आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यावर गेल्या तीन दिवसात दाखल करण्यात आलेला हा दुसरा गुन्हा आहे. आज दाखल करण्यात आलेला गुन्हा आयपीसी 509, 153-1 अ अन्वये दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतूदीनुसारही या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ऑनलाईन बातमीत ही कमेंट करण्यात आली होती.