यूपीआयवरील व्यवहार ‘शुल्कमुक्त’च राहणार

नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली – युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्लॅटफॉर्म (युपीआय) वरून केलेले व्यवहार आगामी काळातही शुल्क मुक्त राहतील असे स्पष्टीकरण नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने शुक्रवारी केले.  ( NPCI dismisses reports of charges on UPI transactions )

युपीआयवरून ( UPI ) केलेल्या व्यवहारावर एक जानेवारी 2021 पासून काही प्रमाणात शुल्क लागणार असल्याचे वृत्त काही वृत्तमाध्यमांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर एनपीसीआयने हे स्पष्टीकरण केले आहे.

युपीआयवरून केले जात असलेले व्यवहार योग्यरीत्या होत आहेत. त्यात कसलेही अडथळे आलेले नाहीत, असे एनपीसीआयने म्हटले आहे. युपीआयवरुन होत असलेल्या व्यवहाराची देखभाल एनपीसीआयकडून केली जाते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.