जामखेड (अहमदनगर) : येथील ‘आरोळे हॉस्पिटल’च्या आवारात ‘स्वच्छ सर्वेक्षणां’तर्गत स्वच्छता आणि कर्जत मतदारसंघात वृक्षारोपण करत कर्जत-जामखेडचे आमदार यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं.
रोहित पवार यांनी प्रथम सरत्या वर्षाला निरोप देऊन मतदारसंघातील कर्जतमध्ये नागरिकांसमवेत वृक्षारोपण करुन नवीन वर्षाचं स्वागत केलं! तसेच या नवीन वर्षानिमित्त आपल्याला भरभरून देणाऱ्या ज्या निसर्गाचं आपण देणं लागतो त्याचं संवर्धन करण्याचा संकल्प करूया, असं आवाहन देखील त्यांनी केलं.
तसेच, जामखेडच्या ‘आरोळे हॉस्पिटल’ ‘स्वच्छ सर्वेक्षणां’तर्गत परिसरात हातामध्ये झाडू घेत आणि श्रमदान करुन परिसरात स्वच्छता केली. यावेळी हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी आणि नागरीक, युवा मित्र, कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला भगिनी यांनी देखील यामध्ये सहभागी होत हॉस्पिटलच्या आवारातील कचरा साफ केला.