नवी दिल्ली – ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी पैसे घेत आहे. त्यानंतर आता फेसबुक आणि इंस्टाग्राम या समाज माध्यमावर व्हेरिफिकेशन साठी पैसे मोजावे लागणार असल्याचे दिसून येते. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलॅंडमध्ये प्रायोगिक पातळीवर हे काम चालू आहे.
जर हा प्रयोग जागतिक पातळीवर सुरू झाला तर भारतामध्ये प्रत्येक महिन्याला यासाठी 1200 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. यासाठी फेसबुक वापरकर्त्यांना त्यांचे अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी सरकारी ओळखपत्र सादर करावे लागेल.
यामुळे त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्यांच्या नावावर इतर कोणी खाते उघडू शकणार नाही. त्याचबरोबर पैसे मोजणाऱ्या फेसबुक अकाउंट धारकांना इतरही अनेक सवलती फेसबुक उपलब्ध करणार असल्याचे सांगण्यात आले.