वीजबिलांसह अन्य माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांपर्यंत
पुणे – वीजबिलांसह अन्य माहिती आता “एसएमएस’द्वारे ग्राहकांना मिळणार आहे. महावितरणचे पुणे परिमंडळ ग्राहकांसाठी वर्गवारी करून ही माहिती पुरवण्यासाठी सज्ज झाले आहे.
परिमंडळांतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आणि इतर वर्गवारीतील एकूण 30 लाख 14 हजार 560 वीज ग्राहक आहेत. तर, शहरातील कोथरूड, शिवाजीनगर, रास्तापेठ, पद्मावती, पर्वती, बंडगार्डन या सात विभागांतर्गत 16 लाख 4 हजार 563 वीज ग्राहक आहेत.
याशिवाय, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी या दोन विभागांतर्गत 6 लाख 71 हजार 450 ग्राहक आणि पुणे ग्रामीण मंडळातील मुळशी, मंचर आणि राजगुरूनगर विभागांतील 7 लाख 38 हजार 547 ग्राहक आहेत. या सर्वांनी आपला मोबाइल क्रमांक ग्राहक क्रमांकासोबत नोंद केला आहे. याशिवाय परिमंडळात अद्याप 1 लाख 24 हजार 353 वीज ग्राहकांनी ही नोंदणी केली नाही, त्यांनी ती तातडीने
करावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
भाडेकरुंनाही नोंदणी करता येणार
अनेक भाडेकरुंच्या घरमालकाचा मोबाइल क्रमांक त्या घराच्या ग्राहक क्रमांकासोबत जोडलेला असतो. परिणामी भाडेकरुंना वीज सेवेची माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे वीज वापरकर्ते असलेल्या भाडेकरुंनी संबंधित ग्राहक क्रमांकासोबत मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
नोंदणी अशी करा
– ग्राहकांनी MERG (स्पेस) (बारा अंकी ग्राहक क्रमांक) असे टाइप करून 9930399303 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.
– याशिवाय 1912, 18001023435 आणि 18002333435 या टोल फ्री क्रमांकावरही नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
– www.mahadiscom.in संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाइल ऍपद्वारेही नोंदणी करता