नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव बिभव कुमार आणि आम आदमी पार्टीशी संबंधित काही लोकांच्या ठिकाणांवर मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून छापे टाकले. असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
छाप्यांचा एक भाग म्हणून राष्ट्रीय राजधानीतील सुमारे १० ठिकाणे सील केली जात आहेत असे सांगितले जात आहे. बिभव कुमार आणि दिल्ली जल बोर्डाचे माजी सदस्य शलभ कुमार यांच्या व्यतिरिक्त इतर काही लोकांच्या ठिकाणावर ईडीकडून छापे टाकले जात आहेत.
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने केजरीवालांवरही पाच वेळा समन्स जारी केली आहेत, पण ती सारी समन्स ईडीने धुडकावली आहेत. त्यानंतर आपने केलेल्या एका आरोपाच्या अनुषंगाने केजरीवाल त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अातिशी यांना पोलीस नोटीसाही जारी केल्या.