मुंबई – मनी लॉंडरिंगच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि विधान परिषदेच्या मतदानासाठी आपल्याला अनुमती देण्याची मागणी केली आहे.
या अर्जात अनिल देशमुख यांनी आपल्याला 20 जून रोजी मतदानासाठी एक दिवस बॉंडवर सोडण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीतील मतदानासाठीही त्यांनी कोर्टाकडे अनुमती मागितली होती पण त्यांना त्यावेळी ही अनुमती मिळाली नव्हती.
असाच अर्ज आता नवाब मलिक यांच्याकडूनही दाखल केला जाणार आहे. विधान परिषदेसाठी येत्या 20 जूनला मतदान होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही दोन्ही मते महत्त्वाची आहेत. अनिल देशमुख यांच्या अर्जावर 15 जून रोजी सुनावणी होणार आहे.