पुणे – दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) जादा गाड्यांच्या आरक्षणास रविवारपासून (दि.6) सुरुवात झाली आहे. पुणे विभागातून नियमित गाड्यांव्यतिरिक्त सुमारे पाचशे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
दिवाळीनिमित्त 22 ते 26 ऑक्टोबरदरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी “एमएसआरटीसी डॉट जीओव्ही डॉट इन’ या संकेतस्थळावर जाऊन किंवा ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन तिकीट आरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर एसटीच्या संबंधित आगारात जाऊन किंवा अधिकृत ठिकाणी प्रवासी तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा जादा बसेस वाकडेवाडी येथील नव्या आगारातून सोडण्यात येणार आहेत. मराठवाडा, खान्देश व विदर्भात जाणाऱ्या जादा बसेस वाकडेवाडी येथून सुटणार असल्याचे, प्रशासनाने सांगितले.