Vijay wadettivar on Shivaji Maharaj Smarak : यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प आहे. या अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसत नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर तोफ डागताना केली.
राज्य सरकारने मांडलेल्या विक्रमी पुरवणी मागण्यांमधील ६५०० कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि २५०० कोटी रुपये पिक विम्याचे आहे. त्यामुळे इतर रक्कम ही कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहे का? असा सवालही वडेट्टीवार यांनी सभागृहात सरकारला उद्देशून केला. | Vijay wadettivar on Shivaji Maharaj Smarak
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागितली जातात.अस्मिता जपण्याच्या गोष्टी केल्या जातात. पण त्यांचे स्मारक बांधण्यासाठी एवढा उशीर होतो. पंतप्रधानांनी स्वतः शिवस्मारकाचे भूमिपूजन केले. पण त्यानतंरही स्मारकास इतका उशीर होत असेल तर हा पंतप्रधानांचा अपमान आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावला. ते राईट टू रिप्लायच्या वेळेस बोलत होते. | Vijay wadettivar on Shivaji Maharaj Smarak
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, वेल्सचा अर्थसंकल्प आम्ही पाहिला, त्या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या विभागांच्या निधीमध्ये कपात करण्यात आली आहे. राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या या पुरोगामी राज्यात मागासवर्गीयांच्या हक्काचा जो निधी आहे त्यामध्ये कपात करण्यात येत आहे. ही कपात २८ टक्के आहे. यातून सत्ताधारी मागासवर्गीय समाजाच्या विरोधात असल्याचेच दिसून येते. समाजातील दिन दुबळ्या, मागासवर्गीय जनतेच्या हक्काचा हा निधी कुठे गेला? कॊणाच्या खिशात गेला असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
महिलांना साडीसोबत एक शस्त्र द्या
विरोधी पक्षाच्या आमदारांना शून्य निधी दिला जात आहे ही द्वेषाची भावना आहे. आमदारांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा,असे म्हणत वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आज महिलांना सक्षम केले असते, तर त्यांना साडी देण्याची वेळ आली नसती. आज महिलांना संरक्षणासाठी साडी देण्यापेक्षा शस्त्र देण्याची आवश्यकता आहे म्हणून साडी सोबत महिलांना स्वतःच्या संरक्षणासाठी या गुंडांच्या राज्यामध्ये एक शस्त्र ही द्या, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. | Vijay wadettivar on Shivaji Maharaj Smarak