मुंबई – “नो वे होम’ हा टॉम हॉलंडने साकारलेला शेवटचा स्पायडर मॅन ठरण्याची शक्यता आहे. कारण स्पायडर मॅनच्या सिनेमांच्या शृंखलेतील हा त्याचा शेवटचा सिनेमा असणार आहे. “नो वे होम’ 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
या सिनेमाबरोबरच टॉम हॉलंडने मार्वल स्टुडिओबरोबर केलेला करार संपणार आहे. त्यामुळे मार्वल स्टुडिओने जर यापुढे स्पायडर मॅनवर सिनेमा केलाच तर कदाचित स्पायडर मॅन म्हणून दुसरा कोणी हिरो दिसण्याची शक्यता आहे.
हा सिनेमा म्हणजे जणू काही स्पायडर मॅनचा “एंडगेम’ असल्याचे सर्व टीमला वाटायला लागले आहे, असे टॉमने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले. आता जर दुसरा कोणी स्पायडर मॅन साकारला तर ते स्पायडर मॅनच्या कथेतील अगदी वेगळे कथानक असेल, असेही तो म्हणाला.
यापूर्वी टॉबे माग्वेअर, अँड्रयू गारफिल्ड,, टॉम हॉलंड, निकोलस हामंड यांनी स्पायडर मॅन साकारला होता. जपानमध्येही स्पायडर मॅनवर सिनेमा होऊन गेला.
त्यात शिंझो टोडो याने स्पायडर मॅन केला होता. त्याव्यतिरिक्त जॅक जॉन्सन, निकोलस केज, ख्रिस पाईन. ढ्रॅक बेल आदींनी वेगवेगळ्या सिरीजमध्ये स्पायडर मॅन साकारला आहे.