Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घुमला “आजीचा’ आवाज…

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सुरेखा कुडची यांना घराबाहेर जावे लागले. आता सुरू झाला नवीन आठवडा… बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार नवे टास्क … या आठवड्यात बिग बॉस घरातील सदस्यांना खास सरप्राईझ देणार आहेत. कालसमोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घरामध्ये स्वागत केले एका खास व्यक्तीचे.

सदस्यांचा आनंद त्या घोषणेनंतर गगनात सामावेना. सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये धावत गेले कारण तितकी खास, जवळची व्यक्ति घरामध्ये आली त्यांना दिसली. घरामध्ये आवाज घुमला आजीचा! हो आजीचा… “कारट्यांनो किती धुडगूस घालता रे… हा संपूर्ण आठवडा माझी तुमच्यावर नजर असणार आहे. चला लागा तयारीला”.

प्रत्येक नातं खास असतं… प्रत्येक नातयात काही देवाण घेवाण सुरू असते. पण आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ति असते जी आपल्याला प्रत्येक वेळेला निरपेक्ष भावनेने काही ना काही देत असते आणि ती व्यक्ति म्हणजे आपली आजी. आई वडील ओरडल्यावर तीच असते जी आपल्याला समजावते… 

तीच असते जी वेळप्रसंगी आपल्यासारखी लहान होऊन आपल्याशी खेळते, मैत्री करते आणि लाड पुरवते. खोडी केल्यावर मायेने धपाटा देखील घालते. बिग बॉस आज घरामध्ये आजीचे मन:पूर्वक स्वागत करणार आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.