पुणे : अपहरण करून ताम्हिणी घाटात नेऊन गोळ्या झाडून खून केल्याच्या प्रकरणात आरोप असलेला तृतीयपंथी दिपा राजमाने यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी जामीन मंजूर केला. त्यांनी ऍड. सचिन झालटे- पाटील , ऍड अजिंक्य मिरगळ, ऍड प्रणाली मुळे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
वारजे भागातून गजाननाचे 18 मे रोजी सायंकाळी पूजा अर्चा करण्याच्या बहाण्याने अपहरण करून ताम्हिणी घाटामध्ये नेऊन गोळ्या झाडून हत्या केल्याचा गुन्हा उघड झाला. पोलिसांनी गाडीतील दोन रक्ताच्या डागावरून खुनाचा छडा लावला.
प्रथम सौरभ आमले व सोमेश चव्हाण यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दिपाचे नाव समोर आले. त्याने दोघांकडून खून करण्यासाठी 20 लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा आरोप होता. ऍड. सचिन झालटे यांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.