Manipur Violence Updates : ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे, या हिंसाचारामुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि लाखो लोकांचा हिंसेत बळी गेला आहेत. अशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना मणिपूरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकारावरून मोदी सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे.
Speaking at the start of the Monsoon Session of Parliament. https://t.co/39Rf3xmphJ
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2023
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( गुरुवार ) माध्यमांशी संवाद साधला. PM मोदी म्हणाले की, ‘मला खात्री आहे की सर्व खासदार मिळून या अधिवेशनाचा जास्तीत जास्त लोकहितासाठी उपयोग करतील, चर्चा जितकी अधिक आणि तीक्ष्ण होईल तितके लोकहिताचे परिणाम येतील. या अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, या काळात जी विधेयके आणली जातील ती जनतेशी संबंधित असतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पीएम मोदींनीही मणिपूर हिंसाचारावर आपली भूमिका मांडली, ते म्हणाले की, मणिपूरमधून जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. असे कितीतरी पापी आहेत, गुन्हे करणारे कोण आहेत ते त्यांच्या जागी, पण संपूर्ण देशाचा अपमान होत आहे आणि 140 कोटी देशवासियांना लाज वाटू लागली आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करावी, विशेषत: माता-भगिनींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलावीत.’