पाटणा: येथून दिल्लीला जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये जेडीयू आमदार आणि प्रवासांमध्ये चांगलाच वाद झाल्याची घटना घडली आहे. जेडीयू आमदार गोपाल मंडल हे ट्रेन मध्ये अंडरवेअर आणि बनियानवर टॉयलेटला गेले होते.
ते टॉयलेटवरून सीटकडे येतांना त्यांच्यावर प्रवाशांनी आक्षेप घेतला. त्यांना प्रवाशांनी आसपास महिला प्रवासी आहेत याचं भान ठेवा, असं सांगितलं मात्र मंडल ऐकायला तयार नव्हते.
मंडल यांनी प्रवाशांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यामुळे ट्रेनमध्ये तैनात असलेल्या आरपीएफ टीमनं पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शनवरील रेल्वे पोलिसांना सूचना दिली. दरम्यान या घटनेमुळे चालत्या ट्रेनमध्ये चांगलाच गोंधळ झाला. सध्या या घटनेचा विडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.