लव्ह जिहाद विरोधी कायद्याअंतर्गत उत्तरप्रदेशात महिनाभरात तब्बल “एवढ्या’ जणांना अटक

लखनौ – उत्तरप्रदेशात अलिकडेच धर्मांतर विरोधी कायदा अध्यादेशाद्वारे लागू करण्यात आला आहे. या कायद्याला तेथे लव्ह जिहाद विरोधी कायदा असे संबोधले जात असून या कायद्याच्या पहिल्या महिन्यात तेथे या कलमांखाली सुमारे 12 गुन्हे नोंदवण्यात आले असून महिना भरात 35 जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार या कायद्यान्वये इटाहला आठ जण, सीतापुरला सात जण, ग्रेटर नॉयडा येथे चार जण, शहाजहानपुर, आणि आझमगड येथे प्रत्येकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मोरादाबाद, मुज्जफरनगर, बिजनोर, कन्नौज, येथे प्रत्येकी दोन जणांना आणि बरेली व हरदोई येथे प्रत्येकी एक जणाला अटक करण्यात आली आहे.या कायद्याअंतर्गत पहिली केस बरेलीत नोंदवली गेली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.