बापरे ! तुळशीचे ‘हे’ साईड इफेक्ट माहीत आहेत ?

Tulsi Side Effects – तुळस म्हणजे सर्वगुणसंपन्न वनस्पती. आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्‍याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. ती केवळ एक वनस्पतीच नाही तर, रोग प्रतिकारशक्ती वाढवणारी इम्युनिटी बूस्टर आणि अँटी-बायोटीक देखील आहे.

आयुर्वेदात रोज सकाळी तुळशीची पाने चावून खाण्याचा सल्ला दिला जातो. चहामध्ये तुळशीची पाने घातल्याने चहाची चव वाढते. तसेच, तुळशीचा चहा पिल्याने अनेक रोगांचे संक्रमण बरे होते. परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का, की या गुणी औषधी तुळशीचे अतिसेवन आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते? चला मग, जाणून घेऊया याच्या साईड इफेक्टबद्दल.

रक्त पातळ होऊ शकते –
तुळशीची पाने जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपले रक्त पातळ होण्याचा धोका वाढतो. अँटी-क्लोटींग औषधांचे सेवन करणाऱ्या रुग्णांनी तुळशीची पाने खाऊ नयेत, कारण असे केल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. यासह, वाल्फरिन आणि हेपरिनसारखी औषधे घेणार्‍या लोकांनाही तुळशीचे अधिक सेवन करणे घातक ठरते.

गर्भवती महिलांना हानिकारक –
तुळशीचे अति प्रमाणात सेवन गर्भवती महिलांसाठीही हानिकारक आहे. तुळशीच्या पानांमध्ये युजेनॉल हा घटक असतो, ज्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी येऊ शकते. म्हणून, तुळशीचे जास्त सेवन केल्याने गर्भवती महिलांना अतिसाराची समस्या होऊ शकते. अशावेळी डॉक्टर, गर्भवती महिलांना तुळशीचे जास्त सेवन न करण्याचा सल्ला देतात.

मधुमेहींना अतिसेवनाने नुकसान –
हायपोग्लाइसेमिक पातळी नियंत्रित करण्याचे गुणधर्म तुळशीच्या पानांमध्ये आढळतात. या कारणास्तव, लोक रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी तुळशीची पाने चघळतात. जेव्हा, मधुमेह असणारे रुग्ण आधीच शुगर कंट्रोल करणारी औषधे घेत असतील आणि एकत्रितपणे तुळशीचे भरपूर सेवन करत असतील, तेव्हा त्यांच्या रक्तातील साखर एकदम कमी होण्याची समस्या देखील उद्भवू शकते. हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्यांना जास्त तुळस न खाण्याचा सल्ला दिला जातो.

तुळशीतील युजेनॉलमुळे अल्सरचा धोका –
तुळशीमध्ये आढळणाऱ्या युजेनॉलमुळे अल्सर होऊ शकतो. जास्त प्रमाणात सेवन केल्याने चक्कर येण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. यामुळे हृदय गती जास्त वाढू शकते. तुळशीचा प्रभाव गरम आहे, म्हणून त्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. यामुळे, पोटात जळजळ, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून तुळशीची पाने मर्यादित प्रमाणातच खावीत, असा सल्ला आयुर्वेदात दिला जातो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.