वनस्पतींमुळे स्थानिक जैवसंपदेला नुकसान होत असल्याचे विविध अभ्यासातून समोर आले आहे. या परदेशी वनस्पतींचे अतिक्रमण हटवून स्थानिक प्रजातीच्या वनस्पती लावण्यासाठी लोकचळवळ उभारली जात असताना, पुणे वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातच “घाणेरी’ या परदेशी वनस्पतीने आपले बस्तान मांडले आहे.
शहरातील टेकड्या, रस्त्याकडेला, खासगी जागांमध्ये अशा अनेक ठिकाणी परदेशी आगंतुक वनस्पतींनी अतिक्रमण केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. या परदेशी वनस्पतींचे समूळ उच्चाटन करण्यासाठी “बायोस्फिअर्स’ या संस्थेतर्फे “मूव्हमेम्ट अगेन्स्ट बायोलॉजिक इन्व्हॅजन’ (माबी) ही चळवळ राबविली जात असून, त्या माध्यमातून टनटनी, कॉसमॉस यासारख्या विविध परदेशी आगंतुक वनस्पतींचे उच्चाटन करून या वनस्पतींबाबत जनजागृती केली जात आहे. एकीकडे ही लोकचळवळ उभारली जात असतानाच, दुसरीकडे मात्र वनविभागाकडूनच परदेशी वनस्पतींबाबत दुर्लक्ष केले जात आहे. विभागाच्या गोखलेनगर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या दारासमोरच “घाणेरी’ या अमेरिकन प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करण्यात आली असून त्यामुळे स्थानिक वनस्पतींनी धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत वनस्पती अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर म्हणाले की, घाणेरी ही मूळची अमेरिकन प्रजातीची वनस्पती आहे. “लॅन्डस्केप डिझाइनिंग’मध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. याच्या फुलांमधील मकरंद गोळा करण्यासाठी काही पक्षी आकर्षक होत असले, तरीही घाणेरी वनस्पतीमुळे स्थानिक वनस्पतींची वाढ खुंटते, त्यामुळे जैवविविधतेवर परिणाम होतो.