खेड – शिवापुर – खेड शिवापुर येथील सेवा रस्त्यावर कचरऱ्याचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य होते.
पुणे-सातारा महामार्गावर खेड- शिवापूर हद्दीतील सेवा रस्त्यावर परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी राडारोडा टाकलेला होता. त्या ठिकाणी दुर्गंधी पसरून स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापुर (बाग) या परिसरामधे महामार्गालगत सेवा रस्त्याच्या शेजारी अनेक महिन्यांनपासून कचऱ्याचे ढिग साचले होते. किंबहुना मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला होता. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक महामार्ग पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे अनेक नागरिकांना त्या रस्त्याने ये जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. ते प्रभात वृत्तपत्रामधे दि.3 मार्च ला छापुन आल्याने प्रशासनाला जाग आली व त्यांनी 4 मार्च रोजी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली.
‘सद्य परिस्थितिला जरी स्वछता झाली असली तरी येणाऱ्या काळात अशीच स्वछता रहावी यासाठी पर्यायी व्यवस्था करावी असे आव्हान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला येत आहे.’
– अक्षदा आदित्य बांडेहवलदार (ग्रामपंचायत सदस्य, श्रीरामनगर)
खरं तर हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाचे आहे. मात्र तरीही मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. व सेवा रस्त्यावर जे मोठे ट्रक थंबतात त्यांच्यावर पण कारवाई केली. जो कोणी कचरा वा हॉटेल मधील घाण त्याठिकाणी टाकत असेल तर त्यांच्यावर करवाई ही करणार असल्याचे स्थानिक जिल्हा
महामार्गाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांनी सांगितले.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथील कंट्रक्शन डिपार्टमेंट ला सांगून सर्व कचरा साफ करून घेतला व सर्विस रोड ला लावलेली सर्व ट्रक काढून टाकली, असे रिलायन्स इन्फ्रा चे अधिकारी अभिजीत गायकवाड यांनी सांगितले