नवी दिल्ली – गेल्या पंधरा दिवसांत 13 व्या वेळेला इंधनाच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. त्यानुसार शनिवारी पेट्रोलच्या दरात 27 पैसे तर डिझेलच्या दरात 25 पैसे इतकी वाढ झाली आहे.
त्यामुळे आज दिल्लीतील पेट्रोलचा दर 83 रूपये 13 पेैसे तर डिझेलचा दर 73 रूपये 32 पैसे इतका झाला आहे. या वाढीमुळे इंधनाचे दर गेल्या दोन वर्षातील उच्चांकी पातळीवर गेले आहेत. गेल्या 16 दिवसात पेट्रोलचा दर 2 रूपये 7 पैसे तर डिझेलचा दर 2 रूपये 86 पैशांनी वाढला आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे की, करोना लसीचा बातमीने लोकांमध्ये उत्साह वाढीला लागल्याचे दिसून येत असून त्यामुळे इंधनाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे त्याच्या किंमतीही आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.