नवी दिल्ली – जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा. कारण या महिन्यात अनेक शक्तिशाली SUV, EV आणि लक्झरी कार लॉन्च होण्यासाठी तयार आहेत. ज्यामध्ये MG ची परवडणारी ईव्ही, टोयोटाची इनोव्हा डिझेल आणि मारुतीची कॉम्पॅक्ट एसयूव्ही फ्रॉन्क्स यांचाही समावेश आहे. याशिवाय लक्झरी कारही याच महिन्यात लॉन्च होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊ या 4 कार बद्दलची माहिती.
1) Maruti Fronx –
मारुती सुझुकी कंपनी या महिन्याच्या मध्यापर्यंत मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हि कार लॉन्च करू शकते. कंपनीने आधीच बुकिंग घेणे सुरू केले आहे एका रिपोर्ट मधून असे कळाले आहे की, फ्रॉन्क्सला आतापर्यंत 15 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. मारुतीच्या या नव्या ‘एसयूव्ही’ कारबद्दल लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत आहे.
2) Toyota innova Diesel –
टोयोटा कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला टोयोटा इनोव्हा डिझेल कारचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनी ही कार G, GX, VX आणि ZX हे चार प्रकारचे मॉडेल आणि व्हाइट पर्ल क्रिस्टल शाइन, सुपर व्हाईट, सिल्व्हर, अॅटिट्यूड ब्लॅक आणि कांस्य अशा एकूण चार प्रकारांच्या रंगांमध्ये कंपनी कार उपलब्ध करून देणार आहे.
3) MG Comet Ev-
MGची सर्वात छोटी आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार या महिन्यात लॉन्च होऊ शकते. ही कार दिसायला अल्टो आणि टाटा नॅनोपेक्षा लहान आहे. MG Motor India ने काही दिवसांपूर्वीच या मॉडेलची घोषणा केली आहे.
4) Lamborghini Urus S –
येत्या 13 एप्रिल रोजी भारतीय बाजारपेठेत Lamborghini Urus S ही कार लॉन्च केला जाईल. कंपनीने यापूर्वी Lamborghini Urus Performante हे मॉडेल लाँच केले होते, त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.