न्यूयॉर्क- न्यूयॉर्क च्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ ने 15 प्राचीन शिल्पे आणि कलाकृती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला असून यात 2000 वर्ष जुना ‘यक्ष’, 800 वर्ष जुनी ‘अप्सरा’ या कलाकृतींचाही समावेश आहे.
हे सर्व शिल्पे स्मगलर डीलर सुभाष कपूर याने विकले होते. सुभाष कपूर सध्या तामिळनाडूच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. ही सर्व कलाकृती इसवी सन पूर्व 1 ते 11 व्या शतकातील आहे. वास्तविक या प्राचीन कलाकृती आणि मूर्ती भारतातून बेकायदेशीरपणे काढून टाकण्यात आल्या होत्या. ते स्मगलर डीलर सुभाष कपूर याने विकल्याचे उघड झाले आहे.
2015 मध्ये सुभाष कपूर याच्या कृतीबद्दल ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ संग्रहालयाने होमलँड सिक्युरिटीशी संपर्क साधला आणि मॅनहॅटन जिल्हा मुख्य कार्यालयाने सुभाष कपूर याच्या गुन्हेगारी तपास करून सुभाष कपूर याला दोषी ठरवून कारवाई केली आहे. याच मुद्द्यावर मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (मेट) ने हे 15 प्राचीन शिल्प भारत सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वात प्राचीन शिल्प म्हणून ओळख असलेले हे सर्व शिल्प पहिल्या शतकापासून ते अकराव्या व्या शतकापर्यंतचे आहेत. त्यामध्ये टेराकोटा, तांबे आणि दगड यांच्या दुर्मिळ कलाकृतींचाही समावेश आहे. संग्रहालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरातत्व कलेचे जबाबदार संपादन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. संग्रहालय भारत सरकारसोबतच्या दीर्घकालीन संबंधांना महत्व देत असून या प्रकरणाचे निराकरण झाल्याचा आम्हाला आनंद आहे, असे ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ कडून सांगितण्यात आले.