शिरूर : शिरूर-हवेलीचे आमदार ॲड.अशोक पवार यांनी आज दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्षपदी विराजमान होऊन विधानसभेचे कामकाज चालवल्याने आज पुन्हा एकदा शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात सोशल मीडियावर आमदार अशोक पवार यांच्या गुणगानाचा धुरळा उडाला … तर भविष्यात मोठी जबाबदारी (मंत्रीपद) मिळणार या चर्चेला ही उधाण आले.
शिरूर—हवेलीच्या राजकीय पटलावर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत विक्रमी मताधिक्यानं विजय मिळविल्यानंतर पक्षश्रेष्ठींचं लक्ष वेधून घेण्यात अशोक पवार हे यशस्वी ठरले. २०१४ चा पराभव आणि २०१९ चा रेकाॅर्ड ब्रेक विजय, याने अशोक पवारांची राजकीय कारकीर्द उंचावली. आमदार झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी याची दखल घेतली. कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला.
सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्ष केलं. ठराविक वेळेपूरतं का होईना पण विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसवून दुसर्यांदा विधानसभेचं कामकाज चालविण्याची संधी दिली. आणि हेच भविष्यात मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. आणि मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अशोक पवार हे माहिर आहेत.
राज्याला दिशा देणारा आमदार म्हणून अशोक पवारांची ख्याती आहे. अभिनव, भरीव, नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात त्यांचा हातखंड आहे. अभ्यासू, दूरदृष्टी, भविष्याचा अचूक वेध घेणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. आणि हि ओळख दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, हे मात्र नक्की …