Virat kohli | इन्स्टाग्रामवर कोहलीचे विक्रमी दहा कोटी फॉलोअर्स

अहमदाबाद – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 10 कोटी फॉलोअर्सचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा कोहली भारताचाच नव्हे तर जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

इन्स्टाग्रामवर कोहलीच्या फॉलोअर्सची संख्या 10 कोटी झाली असून जगभरातील खेळाडूंच्या यादीत कोहली चौथ्या स्थानावर आहे. फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी व नेमार ज्युनिअर हे या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.

जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 10 क्रिकेटपटूंमध्ये इन्स्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणारा कोहली एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. इन्स्टाग्रामवर रोनाल्डोचे सर्वाधिक 26.5 कोटी फॉलोअर्स आहेत.

तर मेस्सी 18.6 कोटी व नेमार 14.7 कोटी फॉलोअर्सहित दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. कोहलीने प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, दीपिका पदूकोन या बड्या स्टार्सलाही मागे टाकले आहे. आजच्या घडीला कोहली सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असणारा स्टार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.