आळंदी – येथील एकादशी दिनी आळंदी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. एकादशी व गुरुवारची नित्यनैमित्तिक श्रींचे वैभवी पालखीची मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली.
तत्पूर्वी आळंदी मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे विश्वस्त डॉ. अभय टिळक, व्यवस्थापक माऊली वीर आदि उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कोरोंनाचे नियमांचे पालन करून विना मंडपातून दर्शन खुले करण्यात आले. दुपारचा महानैवेद्य झाला. गुरुवार दिनीची श्रींचे पालखीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाली. दरम्यान भाविकांनी श्रींचे दर्शनास मंदिर परिसरात तसेच इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली.
पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर मानकरी, सेवक यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माउली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.
आदमापुर संस्थान चे मानकरी वाघापुरे महाराज सदिच्छा भेट
आदमापुर संस्थान चे मानकरी कृष्णात डोणे वाघापुरे महाराज यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास एकादशी दिनी सदिच्छा भेट देवून श्रींचे दर्शन घेतले. यावेळी शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते रोहन कु-हाडे पाटील, अमित कु-हाडे, समिर घुंडरे, सौरभ गव्हाणे, प्रसन्न बोराटे, शुभम जाधव आदि उपस्थित होते. आळंदी देवस्थानचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर यांनी स्वागत केले.