लातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून

लातूर – उदगीर शहरात चाकूने भोसकून तरूणाचा खून झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री शहरातील रेल्वेस्टेशनजवळील बसवेश्वर चौकात घडली. जगदीश किवडे (गांधीनगर, उदगीर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जगदीश किवडे व्होडाफोन केअर सेंटर समोर उभा होता. यावेळी सोन्या नाटकरे (रा. श्यामलाल विद्यालय परिसर, उदगीर) याने जगदीशच्या पोटात चाकूने सपासप वार करून जखमी केले. घटनेनंतर जगदीशला तातडीने लातूर येथील रुग्णालयात नेले जात होते मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

सुनीता विजय किवडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध आज शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उदगीर पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.