नवी दिल्ली – सध्या जागतिक पातळीवर सोने-चांदीचे दर कमालीचे अस्थिर आहेत. त्याचा परिणाम भारतीय बाजारातील दरावरही होत आहे.
मंगळवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 45 रुपयांनी वाढून 46,213 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 86 रुपयांनी वाढून 66,389 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक पातळीवर सोन्याचा दर कमी होऊन 1,778 डॉलर तर चांदीचा दर 25.84 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला.
या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, रुपयाचे मूल्य घसरत असल्यामुळे सोन्याचा दर वाढत आहे. आगामी काळात सोन्याचा दर अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले.