पुणे – शहरात 2022-23 या आर्थिक वर्षात 29 हजार 851 ई-वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी 9 हजार 908 वाहनांची खरेदी झाली होती. दरम्यान, यंदा खरेदी झालेल्यांत सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत.
ई-वाहन खरेदीला शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असून, सबसिडी दिली जाते. तसेच इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल, डिझेल वाहनांना पर्याय म्हणून सीएनजी वाहन खरेदीकडे पाहिले जात होते. पण, सीएनजीचे भावही गेल्या वर्षात किलोमागे 26 रुपयांनी वाढले. यामुळे आता नागरिक ई-वाहनांना पसंती दर्शवत आहेत.
ई-वाहनांची खरेदी
वाहन प्रकार – 2021-22 – 2022-23
दुचाकी- 8,668 – 27,679
कार- 961 – 1,825
बस – 165 – 150
तीन चाकी प्रवासी वाहन- 6 – 42
मालवाहू वाहने- 108 – 155